Pune Crime News | ज्यादा पैशाचे आमिष पडले महागात! तरुणीची 50 लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुंतवणुकीवर (Investment) जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणीला तब्बल 50 लाखांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने दोघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

श्रीमंत बाजार कंपनीचे संचालक (Shrimant Bazar Company) श्रीकांत रामाचार होलेहुन्नर Srikanth Ramachar Holehunnar (रा. पिंपळे निलख), नितीन विलास कोष्टी Nitin Vilas Koshti (वय-42 रा. पिसोळी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी लोणी काळभोर भागात राहायला आहे. तिची आरोपी होलेहुन्नर व कोष्टी यांच्यासोबत झाली. (Pune Crime News)

आरोपींनी श्रीमंत बाजार कंपनीत गुंतवणूक केल्यावर 100 दिवसात 80 लाख 42 हजार रुपये परतावा मिळेल
असे आमिष फिर्यादी यांना दाखवले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैशांची गुंतवणूक केली.
तसेच तिच्या नातेवाईकांनी देखील पैसे गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही.
तसेच गुंतवणूक केलेली 50 लाख 26 हजार रुपयांची रक्कम परत केली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढमे (PSI Dhame) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Expensive lured by more money! Fraud of 50 lakhs of young woman, incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन, लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; दुर्दैवी घटनेमुळे पुणे हळहळलं

Snehal Tarde | ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त 15 हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन