Pune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका

दिघी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  खेड तालुक्यातील आळंदी फाटा (Alandi) येथील साई पॅलेज लॉजवर (Sai Palace Lodge) सामाजिक सुरक्षा विभागाने (Department of Social Security) छापा टाकून सेक्स रॅकेटचा (prostitute racket) पर्दाफाश (Exposed) केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.9) रात्री पावणे दहाच्या सुमारास साई पॅलेस लॉजवर करण्यात आली. या कारवाईत 5 महिलांची सुटका करुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉज चालक, मॅनेजरवर FIR

लॉज चालक सतिश कुमार शेट्टी (वय-41 रा. संतोष अपार्टमेंट, मैदान रोड, उल्हासनगर, ठाणे) आणि लॉजचा मॅनेजर सतिश गौडा (वय-35 रा. साई पॅलेस लॉज, आळंदी फाटा, ता. खेड) यांच्याविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग समाधान सिसोदे (वय-38) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

5 महिलांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.
खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथील साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय (prostitute racket) सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारुन कारवाई केली.
या कारवाईत 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपी पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी 7930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव करित आहेत.

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, मारुती करुचुंडे, गणेश कारोटे, संगिता जाधव, अनिल महाजन, राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले

…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

Web Title : Pune Crime News Explosion of prostitute racket started at Sai Palace Lodge, 5 women released