Pune Crime News | शोरुम चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी, सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मधील फर्स्ट क्राय या कंपनीच्या शोरूम चालकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एका सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) केली आहे.
रविंद्र उर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदनननगर, पुणे), मंगल सातपुते (रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आयपीसी 386, 387, 341, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर रविंद्र ससाणे याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कस्टडीत आहे. ससाणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत जितेंद्र राहुल राम (रा. पुनावळे, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
फिर्यादी यांच्या फिनिक्स मॉल येथील फर्स्ट क्राय या कंपनीच्या शोरुमचे इंटर रिनोव्हेशनचे काम सुरु होते. या कामसाठी लागणारे प्लायवुडचा ट्रक फिनिक्स मॉल येथे आला आसता आरोपींनी ट्रकमधील प्लायवुड फियादी यांच्या कामगारांना खाली करुन न देता आडवणूक केली. तसेच आम्ही येथील स्थानिक असल्याचे सांगून फिर्य़ादी यांच्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागणी केली. तडजोडी अंती साडेचार लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली. तसेच फिर्यादी यांच्याकडून चेकद्वारे दोन लाख आणि उर्वरीत अडीच लाख रुपयांसाठी भेटून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Police Inspector Pratap Mankar),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Srikant Chavan), मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav)
पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रतदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंखे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव,
सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Extortion by threatening to kill the showroom driver, action taken by the crime branch against the innkeeper
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update