Pune Crime News | 1 कोटी 22 लाखांच्या खंडणी प्रकरणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाणसह तिघांविरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | 2 कोटीच्या खंडणीची मागणी करून 1 कोटी 22 लाख रूपये खंडणी (Extortion Case) स्वरूपात घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) अ‍ॅड. प्रविण पंडित चव्हाण (Adv Pravin Pandit Chavan) यांच्यासह तिघांविरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

यासंदर्भात सुरज सुनिल झंवर यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलिसांनी भांदवि 166, 213, 384, 385, 386, 388, 120 ब, 606 आणि 34 प्रमाणे अ‍ॅड. प्रविण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर), शेखर मधुकर सोनाळकर Shekhar Madhukar Sonalkar (नयनतारा अपार्टमेंट, इश्वर कॉलनी, सुपारी कारखान्याजवळ, जळगाव, एमआयडीसी) आणि उदय नानाभाऊ पवार Uday Nanabhau Pawar (रा. जिजळगाव, चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 नोव्हेंबर 2021 ते जुन 2022 दरम्यान विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण, शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांनी आपआपसात संगणमत करून सरकारी लोकसेवक असल्याचा पदाचा गैरवापर करून फिर्यादी झंवर व त्यांच्या वडिलांना नुकसान पोहचवण्यासाठी झंवर यांच्या वडिलांस जामिन मिळणेकामी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल असलेल्या गंभीर गुन्हयात झंवर
यांना अडकवण्याची भिती घातली तसेच मोक्का लावुन आत अकवण्याचा कट करून झंवर यांच्याकडे 2 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली.
त्यानंतर अ‍ॅड. प्रविण चव्हाण आणि इतरांनी त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख रूपये खंडणी स्वरूपात घेतले आहेत.

 

झंवर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.16) फिर्याद दिल्यानंतर अ‍ॅड. प्रविण चव्हाण आणि
इतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Extortion Case Case against Special Public Prosecutor Adv. Pravin Chavan along with three in Deccan police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी