Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रति महिना 10 टक्के व्याजाने घेतलेल्या 2 लाख रूपयाच्या बदल्यामध्ये 2 लाख 40 हजार रूपये परत केल्यानंतर देखील 1 लाख 80 हजार रूपयाची अवाजवी मागणी करून धमकी देत चेक बाऊंसची केस करतो म्हणणार्‍याविरूध्द पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-2 ने Anti Extortion Cell Pune (Pune Police AEC) खंडणीसह महाराष्ट्र सावकारी (Money Lenders In Pune) अधिनियमानुसार लष्कर पोलिस स्टेशनमध्ये (Lashkar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

सूरज शशिकांत म्हेत्रे (Suraj Shashikant Mhetre) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरातील हांडेवाडी (Handewadi Road-Hadapsar) येथील चिंतामणीनगरमध्ये राहणार्‍या 42 वर्षीय व्यक्तीने सूरज म्हेत्रेकडून सन 2021 मध्ये 2 लाख रूपये प्रति महिना 10 टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात आरोपीने मुद्दल आणि व्याजाचे असे एकुण 2 लाख 40 हजार रूपये त्याला वेळावेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात परत केले होते. (Pune Crime News)

पैसे परत केल्यानंतर देखील सूरज म्हेत्रेने वारंवार मोबाईल फोन करून त्यांना शिवीगाळ केली तसेच आणखी 1 लाख 80 हजार रूपयाची मागणी केली. बँकेचे चेक बँकेत भरतो. चेक वटले नाही की मी तुझ्यावर चेक बाऊंसची केस करतो असे म्हणून शिवीगाळ करून सूरज म्हेत्रेने त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, तक्रारदाराने पुणे पोलिसांच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज केला होता.

 

Advt.

तक्रार अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. PI Pratap Mankar)
यांनी सूरज शशिकांत म्हेत्रे याच्याविरूध्द खंडणी आणि सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Extortion case filed against Suraj Shashikant Mhetre for
demanding money even after returning borrowed money with 10 percent interest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा