Pune Crime News | शहरातील प्रसिद्ध सनदी लेखपालाकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, लातूर जिल्हयातील युवकास पुण्यात अटक

पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावर (Social Media) आपली किती माहिती द्यावी, हे आता काळजीचे कारण होऊ लागले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर आपल्या मुलांविषयीची टाकलेली माहिती घेऊन एका व्हाईट कॉलर गुन्हेगाराने (White Collar Criminals) शहरातील प्रसिद्ध सनदी लेखापालाला ३० लाख रुपयांची खंडणीची (Extortion Case) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी पोलिस पथकाने (Pune Police) किरण रामदास बिरादार Kiran Ramdas Biradar (वय २४, रा. मांजरी, पो. आवडकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर) याला अटक केली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मुकुंदनगरमध्ये (Mukund Nagar, Pune) राहणार्‍या एका ५२ वर्षाच्या सनदी लेखपालाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार बीएस्सी झालेला आहे. तो फेसबुक व इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेतो. ही माहिती मिळाल्यावर त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांचा मुलगा कोलकत्ता येथे शिकायला असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकले होते. त्यावरुन त्याने फिर्यादींचा फोन नंबर मिळविला. त्यांना व्हॉटसअप कॉल (WhatsApp Call) केला. त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितली. माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कोलकत्ता येथे असलेल्या मुलाला ठार करीन अशा धमकीचे मेसेज पाठविले.

फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाला याची माहिती दिली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार फिर्यादी त्याला पैसे देण्यास तयार झाले.
त्यांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या.
त्याने सांगितल्याप्रमाणे डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात पैशांची बॅग ठेवण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बॅग ठेवली. पोलिसांनी आजू बाजूला सापळा लावला होता.
बॅग घेण्यासाठी तो आल्याबरोबर पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले.
अशाच प्रकारे त्याने आणखी कोणाकडून पैसे उकळले आहेत का याचा तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Extortion demand of 30 lakhs from the famous Chartered Accountant in the city, youth from Latur district arrested in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर

Solapur ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या माजी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याला सक्त मजुरीची शिक्षा

Ajit Pawar | ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम, तुम्हाला वाटत असेल तर गुन्हा दाखल करा, पण…’, अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर