Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | माल खाली करण्यासाठी माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion Case) वसुल करण्याचे प्रकार वाढत आहेत. असाच एक प्रकार वारजे परिसरात घडला (Pune Crime News) आहे. काचेचा माल खाली करण्यासाठी 8 हजार रुपयांची खंडणी (Extortion Case) मागणार्या गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) अटक केली आहे.
अविनाश दिलीप अडगळे (वय 32, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि.8) वारजे माळवडी येथे करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare) यांना माहिती मिळाली की, वारजे माळवाडी येथील काचेच्या व्यापाऱ्याच्या दुकानात आलेला काचेचा टेम्पो खाली करण्यासाठी एकजण खंडणी मागत आहे. माहितीची शाहनीशा केली असता अविनाश अडगळे याने तेथे येऊन कामगारांवर धमकावून माल खाली करण्याचे काम थांबविले.
हमाली दरपत्रकाप्रमाणे पैसे घेणे अपेक्षीत असताना त्याने माल खाली करण्यासाठी ८ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फिर्यादी व कामगारांना मारहाण (Beating) करण्याची धमकी दिली. अडागळे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) आयपीसी 385, 506 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Pune Crime News)
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil), पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
पोलीस अंमलदार किरण ठवरे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण,
अमर पवार, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या