Pune Crime News | बांगलादेशी नागरिकांवर फरासखाना पोलिसांची कारवाई

पुणे (बासित शेख) : Pune Crime News | शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणार्‍या दोन बांगलादेशी नागरिकांवर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही बांगलादेशींना अटक करण्यात आली असून त्यांना दि. 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे (Faraskhana Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad) यांनी दिली आहे. (Pune Crime News)

ज्वेल अख्तरअली खान (26, रा. शेख बारी, गाव फुकरा, पोस्ट फुकरा, ता. काशीयानी, जि. गोपलगंज, बांगलादेश) आणि मयमुना अख्तर शिउली (21, रा. सिलीपुर, पोस्ट केंदुआ, ता. केंदुआ, जि. नेत्रकोना, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 जानेवारी रोजी एक बांगलादेशी जोडपे बुधवार पेठ परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याबाबतची माहिती शुक्रवार पेठ पोलिस चौकीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग (API Manoj Abhang) यांना मिळाली होती. प्राप्त माहिती वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांना देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग, महिला पोलिस उपनिरीक्षक किर्ती म्हस्के (WPSI Kirti Mhaske), पोलिस नाईक खाडे, पोलिस अंमलदार सोनवणे यांनी शुक्रवार पेठ (Shukrawar Peth) आणि बुधवार पेठ (Budhwar Peth) परिसरात पायी पेट्रोलिंग करून त्यांचा शोध घेतला. क्रांती हॉटेल चौकात एक संशयित जोडपे त्यांना मिळून आले. (Pune Crime News)

पोलिस पथकाने त्यांना हटकले असता ते तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांना बांगला भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास आले. परिसरात राहणार्‍या आणि बांगला भाषा बोलणार्‍या महिलेस पोलिसांना बोलावले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बांग्लादेशी शाळा सोडल्याचा दाखला व बांगलादेशचे नॅशनल आय कार्ड मिळून आले. त्यांच्याकडे पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारची वैध कायदपत्रे नसल्याने त्यांच्याविरूध्द पोलिस हवालदार चलसाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना दि. 22 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदिप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलिस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), फरासखाना विभागाचे
सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक निरीक्षक मनोज अभंग, महिला पोलिस उपनिरीक्षक किर्ती म्हस्के,
पोलिस हवालदार नारायण चलसाणी, पोलिस नाईक सचिन खाडे आणि पोलिस अंमलदार सोनवणे यांच्या पथकाने
ही कामगिरी केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Faraskhana police action against Bangladeshi citizens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…