Pune Crime News | वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घरकामासाठी आईकडून होत होती मारहाण, वडिलांना केली अटक

पुणे : Pune Crime News | घरकाम करावे यासाठी आईकडून मारहाण (Beating) होत असतानाच वडिल या मुलीला अश्लिल चाळे करायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Pune Crime News)
हा प्रकार येरवड्यातील जयप्रकाशनगर मध्ये ३० डिसेबर २०१८ पासून सुरु होता. पोलिसांनी (Pune Police) नराधम वडिलांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी असून तिची आई तिला वारंवार घरकामावरुन मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करीत असे. तिचे वडिल तिच्याबरोबर अश्लिल चाळे करीत असत. घरात फरशी पुसत असताना तिचे वडिल तिच्याकडे अश्लिल नजरेने पहात असत. (Pune Crime News)
फिर्यादी मुलगी परीक्षा संपल्यावर रास्ता पेठेतील मैत्रिणीकडे गेली होती. त्यावेळी बोलताना तिने आपले वडिलांची वागणूक कशी आहे, हे सांगून मला घरी जावेसे वाटत नसल्याने मैत्रिणीला म्हणाली. मैत्रिणीचे घर समर्थ पोलीस ठाण्याजवळ (Samarth Police Station) असल्याने तिच्या मैत्रिणीने फिर्यादीला पोलीस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा दाखल करुन तो येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) वर्ग करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Father molested minor girl; Mother was beating her for housework, father was arrested
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू