Pune Crime News | बहिण म्हणून ओळख सांगणार्‍या वडिलांना महिलेसोबत मुलीने पकडले रंगेहाथ लॉजवर; मुलीला मारहाण करुन कोंडून वडिल, महिला पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आपली बहिण असल्याची ओळख सांगता आणि तिच्याबरोबर लॉजवर काय करता, असा प्रश्न तरुणीने वडिलांना विचारत रंगेहाथ पकडले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्याच मुलीला मारहाण (Beating) करुन तिला लॉजच्या त्याच खोलीत कोंडून दोघे पसार झाले. ही घटना हवेली तालुक्यातील कुडजे येथील साहील लॉजवर (Sahil Lodge) २८ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६६/२२) दिली आहे. त्यावरुन किरकटवाडी (Kirkitwadi) येथे राहणार्‍या तरुणीचे वडिल आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथे राहणार्‍या फिर्यादी यांचे वडिल कर्वेनगर (Karve Nagar Pune) येथे राहणार्‍या एका महिलेची आपली बहिण असल्याची ओळख सांगत तिच्याबरोबर संबंध ठेवून होते. फिर्यादी यांना त्यांच्या संबंधाविषयी संशय होता. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या पाळतीवर होती. २८ डिसेंबर रोजी ते दोघे साहील लॉजवर गेले असताना फिर्यादीही तेथे गेल्या. तेथे एका रुममध्ये त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले. ही तुमची बहिण आहे, असे आम्हाला सांगता मग तिला घेऊन येथे लॉजवर काय करताय, असे वडिलांना तिने विचारले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन रिलिंगवर आपटून फोडला.

 

दोघांनी तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. हा प्रकार लॉजमधील कामगार पहात होती.
त्यांनी फिर्यादी यांचा छातीजवळ हात घालून शर्ट फाडल्यामुळे कामगारासमोर हा प्रकार घडल्याने तिच्या
मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी तिला रुममध्ये ठेवून बाहेरुन दरवाजा बंद करुन पळून गेले.
उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Father posing as sister caught with woman by daughter
at Lodge; Father beats daughter and locks her up, woman escapes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा