Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना ! 13 वर्षाच्या पोटच्या मुलीला जिवंत कॅनॉलमध्ये फेकले, मुलीचा खून करणाऱ्या वडिलांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक वाद (Family Disputes) 13 वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पोटच्या 13 वर्षाच्या मुलीला जिवंत कॅनॉलमध्ये फेकून तिचा खून (Murder) केल्यानंतर वडिलांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted Suicide) केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस (Pune Police) आणि अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी कॅनोलच्या पाण्यात मुलीचा मृतदेहाचा शोध घेतला. अखेर 10 तासांनी तिचा मृतदेह (Pune Crime News) मिळू आला.

तनुश्री संदीप शिंदे Tanushree Sandeep Shinde (वय-13) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी वडील संदीप शिंदे (वय-36 अंदाजे) याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. आरोपीने मित्र मंडळ चौकातील वीर सावरकर पुतळ्या पाठिमागील कॅनॉलमध्ये मुलीला टाकून दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दल आणि स्वारगेट पोलिसांनी पहाटे साडे पाचच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती संदीप शिंदे हा रिक्षा चालक आहे. 13 वर्षांपूर्वी त्यांच आणि फिर्य़ादी यांचं लग्न झालं होतं. संदीप याला दारुचे व्यसन होते. आर्थिक आणि चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात गेल्या पाच वर्षापासून वाद आहेत. काही दिवस ते वेगळं राहत होते. फिर्यादी यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. दरम्यान आरोपीने दारु पिण्याचे सोडून दिल्याने फिर्य़ादी आणि आरोपी पुन्हा एकत्र राहू लागले होते. परंतु त्यानंतर त्याने पुन्हा दारु पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीत पुन्हा वाद होऊ लागले.

घर खर्च आणि चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी या एक महिन्यापूर्वी तनुश्रीला घेऊन बहिणीकडे राहण्यास गेल्या. त्यामुळे आरोपी धनकवडीत एकटाच राहत होता. वडील संदीप शनिवारी व रविवारी तनुश्रीला घेऊन येत होता. याच दरम्यान संदीपने पत्नीला घटस्फोटाची (Divorce) नोटीस पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मित्राला फोन करुन दिली माहिती

आरोपी संदीपने गुरुवारी रात्री तनुश्रीला तिच्या आईकडून घेऊन आला.
पहाटेच्या दरम्यान त्याने वीर सावरकर पुतळ्या पाठिमागे असलेल्या कॅनॉलमध्ये तनुश्रीला नेले.
त्याठिकाणी तिला जिवंत कॅनोलमध्ये फेकून देत तिचा खून केला. त्यानंतर तो चौकात उभा केलेल्या रिक्षात बसला.
त्याने एका मित्राला फोन करुन मुलीला मारल्याची माहिती दिली. मित्राने तातडीने याठिकाणी धाव घेतली.
तसेच संदीपच्या पत्नीला याबाबत माहिती दिली. हे ऐकून आईला धक्का बसला.
त्यानंतर ही माहिती स्वारगेट पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली.
तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आरोपीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा
प्रयत्न केला. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले.

10 तासांनी सापडला मृतदेह

पोलीस व अग्निशमन दलाकडून कॅनोलमध्ये मुलीचा शोध घेतला जात होता.
पहाटेपासून तिचा शोध घेतला जात होता. पण, तिचा शोध लागत नव्हता.
पोलिसांनी खासगी व्यक्तींना देखील बोलवून घेत मुलाचा शोध सुरू केला.
त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला.

Web Title :- Pune Crime News | father push 13 year old daughter in canal and drank poison pune  shocking news husband wife dispute