Pune Crime News | पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन, तर येरवडा पोलीस स्टेशन समोरून आरोपीने ठोकली धूम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फसवणूक प्रकरणात (Cheating Fraud Case) हरियाणा येथून अटक करुन पुण्यात आणले जात असताना एका महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपीने पोलिसांना (Pune Police) गुंगारा देऊन पलायन केले. (Pune Crime News)

सादिया सिद्दीकी (वय-35) असे पळून गेलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सादिया हिच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तिचा शोध घेतला. सादीया हरियाणात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन तिला अटक केली. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सादियाला घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पथक रेल्वेने पुण्याकडे येत होते. राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्थानकाजवळ रेल्वे सिग्नल साठी थांबली होती. त्यावेळी सादियाने पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेली.

येरवडा पोलीस स्टेशन समोरुन आरोपी पळाला

येरवडा : येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपीने येरवडा पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वाराजवळून पळ काढला. हा प्रकार बुधवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशन येथे घडला. सिद्धार्थ संजय भालेराव (वय-21 रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार गोविंद पंढरीनाथ जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी सिद्धार्थ भालेराव याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यात त्याला दोषी ठरविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
तो फिर्यादी पोलीस हवालदार गोविंद जायभाये यांच्या ताब्यात होता. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास
त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने पोलीस स्टेशनच्या प्रवेश द्वारावरुन फिर्य़ादी यांना गुंगारा देवून पळून गेला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी