Pune Crime News | आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून भरदिवसा गणेश पेठेत दोघांवर टोळक्याने हातोडा, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हरने खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.2) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शितळादेवी मित्र मंडळाच्या समोरील रोडवर घडली आहे. याप्रकरणी आंदेकर टोळीतील (Andekar Gang) 14 जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय-30 रा. सर्व्हे नं. 25, आंबेगाव पठार, महादेव मंदिराजवळ, पुणे) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंडु आंदेकर (Bandu Andekar), कृष्णा आंदेकर (Krishna Andekar), तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, रामजी गुजर, आकाश पैलवान, अमित पाटोळे, यश पाटील, आयुष बिडगर, अमिर खान यांच्यासह इतर 3 ते 4 जणांवर आयपीसी 307, 326, 341, 506, 120(ब), 143, 147, 149, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत दुधभाते याचा मित्र सोमनाथ गायकवाड (रा. नाना पेठ) याचे आणि बंडु आंदेकर व कृष्णा आंदेकर यांच्याबरोबर वाद आहेत. सोमनाथ गायकवाड हा सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहे. आरोपींनी फिर्यादी व जखमी निखील आखाडे (वय-30 रा. मोहननगर, धनकवडी) यांना जिवे ठार मारण्याचा कट रचला. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी अनिकेत व जखमी निखील हे शितळादेवी मंदिरासमोरील रस्त्यावरुन त्यांच्या व्हेस्पा (एमएच 12 एसपी 4347) गाडीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी रामजी गुजर , आकाश पैलवान, अमित पाटोळे, यश पाटील, आयुष बिडगर, अमीर पठाण व त्यांच्या सोबत असलेल्या इतर तीन ते चार जणांनी फिर्यादी यांची गाडी आडवली. (Pune Crime News)

आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला तुम्ही खुप माजलात, आज तुमचा गेम करतो असे म्हणत रामजी गुजर याने हातातील हातोड्याने तसेच आकाश पैलवान याने लोखंडी रॉडने तर अमीर आणि आयुष यांनी स्क्रू ड्राव्हरने निखील आखाडेच्या डोक्यावर व अंगावर वार केले. तर अमित पाटोळे व यश पाटील यांनी फिर्यादी अनिकेत याला पकडले असता आरोपींनी त्याच्याही डोक्यात व पाठीवर मारून गंभीर जखमी केले. आरोपींनी तिथून जाताना हातातील हत्यारे हवेत फिरवून आंदेकरच्या नादी लागायचं नाही. बंडु आंदेकर पुण्याचा बाप आहे असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे (Senior PI Suresh Shinde), पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे
(PI Pramod Waghmare), सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पांडुरंग पाटील (API Dadasaheb Pandurang Patil),
पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Saurabh Mane), सुनिल रणदिवे (PSI Sunil Randive) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 46 वी स्थानबध्दतेची कारवाई