Pune Crime News | कुत्रे भुंकल्याच्या कारणावरुन बाप-लेकाला बेदम मारहाण, भावावर आणि पुतण्यावर FIR; बालेवाडी मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Crime News | कुत्रे भुंकल्याच्या किरकोळ कारणावरुन बाप-लेकांना लोखंडी सळईने बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. हा प्रकार बालेवाडी येथील दसरा चौकात शुक्रवारी (दि.17) रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी जखमी मुलाच्या काका आणि चुलत भावावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुरेश दामु बालवडकर Suresh Damu Balwadkar (वय-43 रा. भारती विद्यापीठ जवळ, दसरा चौक, बालेवाडी) यांनी शनिवारी (दि.18) चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय दामु बालवडकर (Damu Balwadkar), आकाश दत्तात्रय बालवडकर Akash Dattatraya Balwadkar (रा. दसरा चौक, बालेवाडी) यांच्या विरुद्ध आयपीसी 325, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांचे भाऊ आणि पुतणे आहेत.
शुक्रवारी रात्री फिर्यादी यांचा कुत्रा भुंकल्याने आरोपींनी वाद घातला.
याच वादातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा संदेश बालवडकर याला लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.
यामध्ये संदेश याचा उजव्या हताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इनामादार करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | FIR against brother and nephew for beating father and son for barking dogs; incident in Balewadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR