Pune Crime News | जमीन व्यवहाराच्या वादातून ठेकेदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून चाकूने वार, तुळापूर मधील घटना; तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जमीन व्यवहाराच्या वादातून एका ठेकेदाराला (Contractor) पिस्तुलाचा धाक (Pistol) दाखवून चाकूने वार (Stabbing) केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तुळापूर येथे घडली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) तुळापुर येथील जय मल्हार हॉटेल समोर बुधवारी (दि.1) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडला आहे.

याबाबत संजय प्रभाकर चव्हाण Sanjay Prabhakar Chavan (वय-46 रा. तुळापुर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार गोपीचंद शिवले (Gopichand Shivale), आशुतोष लोखंडे (Ashutosh Lokhande) आणि एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 324, 323, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

तुळापूर येथील ठेकेदार संजय चव्हाण यांच्या मुलाच्या मोबाईलवर गोपीचंद शिवले याने फोन करुन फिर्य़ादी
यांच्याबाबत चौकशी केली. त्यानंतर फिर्यादी हे घरी आले असता त्यांच्या मुलाने शिवले यांचा फोन आल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी शिवलेले फोन केला. त्याने फिर्यादी यांना गावात बोलावून घेतले.
संजय चव्हाण हे गावात गेले असता गोपीचंद आणि आशुतोष यांनी शिविगाळ करुन दमदाटी केली.
तसेच तुला डॉ. ढगे यांना द्यायला पैसे आहेत, आम्हाला द्यायला नाहीत, असे म्हणून मारहाण (Beating)
करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्या ठिकाणच्या नागरिकांनी ही भांडणे सोडवली. त्यावेळी फिर्यादी यांनी आपण पोलीस ठाण्यात जाऊन वाद मिटवू असे म्हणत ते पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाले.
त्यावेळी शिवले याच्यासह इतर दोन आरोपींनी संजय यांचा गाडीचा पाठलाग केला.
जय मल्हार हॉटेलसमोर संजय यांची गाडी आडवली.
गोपीचंद याने हातातील पिस्तूलाचा धाक दाखवत संजय यांना गाडीतून खाली उतरवले.
त्यानंतर आशुतोष लोखंडे याने संजय यांच्या हातावर चाकूने वार केले,
तर कारमधून आलेल्या अनोळखी व्यक्तीने संजय चव्हाण यांच्या दंडावर वार करुन जीवे मारण्याची
धमकी (Threats to kill) दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Advt.

Web Title :-  Pune Crime News | fir registered against three people for beating man in koregaon bheema

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Jaya Bhardwaj | ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण?