Pune Crime News | मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य, पतीसह 7 जणांवर जादूटोणा कायद्यांतर्गत FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असताना महिलेशी अघोरी कृत्य करुन तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Pune Police) पतीसह सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा (Pune Crime News) प्रकार बीड येथे महिलेच्या सासरी घडला आहे.
याबाबत एका 27 वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग (Molestation), शारीरिक मानसिक छळ (Physical torture) तसेच महाराष्ट्र नरबळी (Maharashtra Narbali) आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम (Witchcraft Prevention Act) आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कामखेडा येथील सागर ढवळे याच्यासोबत लग्न झाल्यानंतर फिर्य़ादी या पतीच्या घरी राहत होत्या.
लग्नानंतर पती आणि त्यांच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.
मासिक पाळी दरम्यान दीराच्या सांगण्यावरुन आरोपींनी संगनमत करून महिलेचे हातपाय बांधून अघोरी कृत्य केले.
या छळामुळे फिर्यादी या विश्रांतवडी येथे माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार बीडमध्ये घडला असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बीड पोलिसांकडे (Beed Police) वर्ग केला आहे.
Web Title :- Pune Crime News | FIR under witchcraft act against 7 including husband for rape of menstruating woman
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे