Pune Crime News | NCC च्या सरावादरम्यान फायरिंग ! 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, प्रशिक्षकास 7 वर्ष सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राष्ट्रीय छात्र सेनेच्या National Cadet Corps (NCC) सरावादरम्यान फायरिंग करताना 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या (NCC Student Pune) डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास पुणे न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे (Pune Court News). सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव (Sessions Judge P.P. Jadhav) यांनी हा निकाल दिलेला आहे. (Pune Crime News)

 

आमोद अनिल घाणेकर Amod Anil Ghanekar (27, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. पराग देवेंद्र इंगळे Parag Devendra Ingle (13) याचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. फेब्रुवारी 2013 मध्ये सेनावती बापट रस्त्यावरील राष्ट्रीय छात्र सेनेच्या म्हणजेच एनसीसीच्या मुख्यालयात ही घटना घडली होती. पराग इंगळे हा पाषाण परिसरातील लॉयला शाळेचा (Loyola School Pashan Pune) विद्यार्थी होता. घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी सरावाच्यावेळी प्रशिक्षक घाणेकर हा विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपवून फायरिंग करण्याचे प्रशिक्षण (Training Of Firing) देत होता. त्याच वेळी अचानकपणे पराग उठून उभा ठाकला आणि घाणेकरच्या बंदुकीतील गोळी त्याच्या डोक्याला लागली. (Pune Crime News)

 

डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) याप्रकरणी आमोद घाणेकर याच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी त्याच्याविरूध्द न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सदरील गुन्हयात वगळण्यात यावे यासाठी आमोद घाणेकरने अर्ज देखील केला होता. मात्र, सप्टेंबर 2014 मध्ये तो अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. खटल्याचे कामकाज सरकारी वकिल राजेश कावेडिया (Adv Rajesh Kavediya) यांनी पाहिले आहे.
न्यायालयाने सुनावलेल्या दंडाच्या रक्कमेतील 3 लाख रूपये पराग इंगळे
याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी तसेच आमोद घाणेकरने दंड भरला नाही
तर त्याला अतिरिक्त 1 वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे,
असे न्यायालयाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime News | Firing during practice of NCC students! 13-year-old student dies, coach jailed for 7 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

Baramati NCP MP Supriya Sule | विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी; निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले