Pune Crime News | पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगारावर गोळीबार; प्रचंड खळबळ

पुणे : Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशनच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील महंमदवाडी रोडवर (Mahamadwadi Road Pune) दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर (Criminals On Pune Police Record) गोळीबार (Firing In Pune) केला. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. (Pune Crime News)

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा – Syyednagar Kondhwa) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

पच्चीस शेख याच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करण्यात येत आहेत. गुलाम दौस खान असे आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.
खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार
(Pune Firing News) केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला.
त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Advt.

घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा
(IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर Sr PI Pratap Mankar
(खंडणी विरोधी पथक-2 Anti Extortion Cell Pune (AEC Pune), वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे
(Sr PI Bhausaheb Patare), वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम (Sr PI Ulhas Kadam) यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली आहे.

Web Title : Pune Crime News | Firing On Pune Criminal Pacchis alias Faizan Ramazan Shaikh Mahamadwadi Road Wanwadi Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख