Pune Crime News | बॅड टचला विरोध केल्याने बापाने गरम इस्त्रीचा मुलीच्या गालाला दिला चटका

पुणे : Pune Crime News | शाळेत जाणार्‍या १५ वर्षाच्या मुलीबरोबर तिचाच बाप अश्लिल चाळे करीत असे. तिच्या अंगाला नको (Bad Touch) तेथे स्पर्श करीत असे. त्याला तिने विरोध केल्याने बापाने आपल्याच मुलीच्या गालाला गरम इस्त्रीने चटका देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत कात्रज येथील एका १५ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५५९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४३ वर्षाच्या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही शाळेत जाते. तिचे वडिल तिला बॅड टच करत असत. त्याला तिने वेळोवेळी विरोध केला होता. शनिवारी सकाळी ती शाळेत जाण्याची तयारी करीत होती. त्यासाठी ती कपड्यांना इस्त्री करत होती. त्यावेळी तिचा बाप मागून येऊन तिला बॅड चट करु लागला. तिने जाब विचारला असता. त्याने शिवीगाळ करुन तिच्या बॅगेमधील पुस्तके फाडून टाकली. त्यानंतर त्याने तिला पुन्हा बॅड टच केल्यावर तिने बापाला ढकलून दिले. तेव्हा त्याने गरम इस्त्रीचा चटका तिच्या गालाला देऊन मारहाण (Beating) केली व जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. पोलीस उपनिरीक्षक थले (PSI Thale) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breakfast मध्ये Upma खाल्ल्याने मिळेल Healthy Calorie, पोट आणि कंबरेची चरबी होईल नष्ट

Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढताच पायांकडून मिळतो संकेत; हे बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

Longevity | जर तुम्हाला पाहिजे असेल दीर्घायुष्य तर करा हे काम, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Monsoon Health | पावसाळ्यात कफ दोष शांत करण्यासाठी अवलंबा हा डाएट प्लान, जाणून घ्या काय खावे आणि काय नाही?