Pune Crime News | पुण्यातील बिल्डरच्या घरातून परदेशी बनावटीची पिस्तुल, दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder) घरातून परदेशी बनावटीचे पिस्तूल (Pistol), 8 काडतुसे (Cartridges), रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार (Pune Crime News) पुण्यातील पाषाण रोडवरील सिंध सोसायटीत उघडकीस आला आहे.

 

यासंदर्भात जगदीश लक्ष्मणराव कदम Jagdish Laxmanrao Kadam (वय-57 रा. शाश्वत बंगला, सिंध सोसायटी, पाषाण रस्ता, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

जगदीश कदम हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.
त्यांच्याकडे इटालियन बनावटीचे पिस्तूल (Italian Made Pistol) आहे.
चोरट्यांनी कदम यांच्या घरात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे कुटुंबीय झोपले होते.
चोरट्यांनी बेडरुममधील कपाट उचकटून दोन लाखाची रोकड, दागिने, इटालियन बनावटीचे पिस्तूल,
आठ काडतुसे असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Foreign made pistol, jewelery looted from builder’s house in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police News | पुण्यात सापडलेली हैदराबादमधील अल्पवयीन मुलगी खडकी पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात

Parbhani Crime News | घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना चुलत भावाची आत्महत्या

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम