Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

पुणे : Pune Crime News | बंगला विकत घेतो, असे सांगून कागदपत्राच्या झेरॉक्स घेऊन त्यावरुन बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार केली. त्याआधारे बंगला दुसर्‍याला विकला. त्याने त्या बंगल्यावर २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत बिबवेवाडी येथील ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मिलिंद भुसारी (रा. गुरुवार पेठ), राजेश रमेश खंडेलवाल आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नींच्या नावाने बिबवेवाडीतील
सहानी सुजन पार्कमध्ये बंगला आहे. मिलिंद भुसारी याने बंगला विकत घेतो, असे सांगून त्यांच्याकडून
बंगल्याचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रती घेतल्या. त्यातील सीटीएस नंबरमध्ये फेरफार करुन मालमत्तापत्रक बनावट
बनविले. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने दुसर्‍यांचे फोटो लावून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार केले.
फिर्यादीच्या बंगल्याचा पुणे महानगर पालिकेचा बांधकाम चालू करण्याचा दाखला व बांधकाम पूर्ण झाल्याचा
दाखला याचा वापर केला. फिर्यादी यांचा बंगला राजेश खंडेलवाल यांना विकला. त्यावर खंडेलवाल यांनी २ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचे होम लोन बँकेतून मंजूर करुन फिर्यादी यांची फसवणूक (Cheating Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | forged documents in the name of buying a bungalow; Another took a loan of two and a half crores on a bungalow, cheating a 75-year-old senior

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम