Pune Crime News | कोंढव्यातील बंगल्याची तयार केली बनावट कागदपत्रे; 11 कोटी 80 लाखाच्या फसवणूक प्रकरणी मुद्रिक मर्चंट, परवेज मुर्तुजाला अटक तर फरीदा मर्चंट, अबिद शेख, धनंजय राठोड अन् अस्लम मुजावर विरूध्द FIR

पुणे : Pune Crime News | अमेरिकेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाने पुण्यातील बंगला विक्री करण्यासाठी ग्राहक पाहण्यासाठी कागदपत्रे पाठविली. त्या कागदपत्राच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करुन एजंटांनी गहाणखत तयार करुन ११ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे़ मुद्रिक मर्चंट Mudrik Merchant (रा. हडपसर) आणि परवेज मुर्तुजा Parvez Murtuza (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फरीदा मर्चंट Farida Merchant, आबिद शेख (Abid Shaikh), आयेशा, धनंजय राठोड (Dhananjay Rathod), अस्लम मुजावर (Aslam Mujawar)व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत आब्बास इब्राहिम कपाडिया (वय ७०, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६३/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आब्बास कपाडिया हे सध्या अमेरिकेत रहायला आहे.
त्यांचा कोंढव्यात बंगला आहे. त्यांना हा बंगला विकायचा होता.
त्यांनी आपले नातेवाईक व आबिद शेख याच्यावर विश्वास ठेवून त्यांना बंगल्याची कागदपत्रे पाठविली होती.
या बंगल्याच्या कागदपत्राचा वापर करुन फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी यांचे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड
तयार करुन त्या आधारे दस्त नोंद केली. हा बंगला आरोपींनी आपलाच असल्याचे दाखवून त्याआधारे
पंजाब हाऊसिंग फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि कॅपेरो लिकडून गहाणखताचे आधारे एकूण ११ कोटी ८०
लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याचा इतरत्र वापर करुन फिर्यादींची फसवणूक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रुईकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Forged documents of bungalow in Kondhwa; Mudrik Merchant, Parvez Murtuja arrested in 11 crore 80 lakh fraud case, FIR against Farida Merchant, Abid Sheikh, Dhananjay Rathod and Aslam Mujawar