Pune Crime News | चाकण : महाळुंगे इंगेळे येथील तरुणाच्या खुनातील पाच आरोपींना अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील भर चौकात रविवारी (दि.26) दुपारी साडेबाराच्या सुमारास तरुणावर सपासप वार करुन आणि लाकडी दांडक्याने माराहण करुन खून (Muder In Khed) केला होता. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत संदेश बापुराव भोसले (वय-21 रा. महाळुंगे, ता. खेड) याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अभिराज शिवाजी जावळे (वय 21 रा. महाळुंगे), शंभू भोसले, वैभव आंधळे, विनोद बटलवार, शेखर नाटक, छोटा साकेत यांच्यावर आयपीसी 302, 307, 143, 146, 148, 149 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून, छोटा साकेत फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावातील हॉटेल रेणुका ते ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रोडलगत प्रतीक गॅस
रिपेरिंग दुकानाजवळ मयत रितेश संजय पवार (वय-31) उभा होता. आरोपी शंभू भोसले याच्याशी झालेल्या वादातून
शंभू भोसले त्याच्या इतर साथीदारांसह त्याठिकाणी आला. त्यांनी रितेशला लोखंडी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने
मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन रितेश याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र संदेश भोसले हा गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. त्यांना पकडण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथके तसेच
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पथके आरोपींची मागावर होते. पोलिसांच्या पथकाने 24 तासात आरोपींना
बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना