Pune Crime News | भांडणे सोडविण्यास गेलेल्या पितापुत्रांना चौघांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

Pune Crime News | Four men tried to kill father and son who had gone to resolve a dispute by beating them with iron rods and wooden sticks

पुणे : Pune Crime News | भाडेकरु यांच्यामध्ये लहान मुलांचे कारणावरुन वाद व भांडणतंटा चालू असताना तरुण व त्याचे वडिल ती सोडविण्यासाठी गेले. त्यांनी जमलेल्या लोकांना इकडे कशाला आले असे विचारल्यावरुन वीटभट्टीवर काम करणार्‍या चौघांनी त्यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याघटनेत दत्तात्रय शंकर पारखी (वय ४०, रा. मुलाणी वस्तीजवळ, माण, ता. मुळशी) हे व त्यांचे वडिल जखमी झाले आहे. पारखी यांच्या फिर्यादीवरुन हिजंवडी पोलिसांनी नवनाथ कैलास मोरे (वय २०), रवी संजय मोरे (वय २६), सचिन संजय मोरे (वय २४, रा. रफिक मुलाणी यांचे वीटभट्टीवर, मुलाणी वस्ती, माणगाव, ता. मुळशी, मुळ रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. कैलास मोरे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना माणमधील मुलाणी वस्तीजवळ २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाडेकरु यांच्यामध्ये लहान मुलांचे कारणावरुन वाद व भांडणतंटा चालू असताना फिर्यादी व त्यांचे वडिल भांडण सोडविण्यासाठी तेथे गेले होते. तेथील वाद सोडवून जमलेल्या भाडेकरु व लोकांना तेथून जाण्यास सांगत होते.

त्यावेळी वीटभट्टीवर मजुरी काम करणारे वॉटर एटीएमजवळ असताना त्यांना पाहून फिर्यादी यांनी जा इकडे कशाला आले, असे म्हणाले. आरोपींनी ते काम करीत असलेल्या जवळील वीटभट्टीवर जाऊन हातामध्ये लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. हे पाहून त्यांचे वडिल सोडविण्यासाठी मध्ये आले असताना त्यांनाही लाकडी दांडक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक कांदे तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Attempt to kill security guard by hitting him in the head with an iron rod; Housekeeping contractor arrested, security guard in coma after fatal beating

Pune Crime News | सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला केली अटक, जीवघेण्या मारहाणीत सुरक्षा रक्षक कोमात