Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; कोंढव्यातील घटना

पुणे : Pune Crime News | चारित्र्याचा संशयावरुन झालेल्या वादावादीत पतीने पत्नीला (Husband Wife Quarrel) जोरात ठोसा मारुन तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोंढव्यातील (Kondhwa News) भाग्योदयनगरमधील गल्ली नं. ३२ येथे रविवारी दुपारी तीन वाजता घडली. (Pune Crime News)

याप्रकरणी एका २७ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 31 वर्षीय व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे पती पत्नी आहेत.
आरोपी हा नेहमी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असे.
त्यावरुन फिर्यादीशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.
रविवारी दुपारी त्याने भांडण उकरुन काढले. फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यात त्यांच्या नाकावर हाताने जोरात ठोसा मारला. तोंडावर लाथ मारली.
त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्या गंभीर जखमी झाल्या.
सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | fractured wife’s nose bone with suspicions of character; Incident at Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra BJP | ‘उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या, शिमग्याच्या बोंबा पुरे आता…’, उद्धव ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर…’, मोदींच नाव घेत भाजप- शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी दिलं खुलं आव्हान

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा…’, भास्कर जाधवांचा इशारा