Pune Crime News | 1 कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास बेनिफिट मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची फसवणूक

पुणे : Pune Crime News | सध्या सर्वत्र ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन एकाने व्यावसायिकांना तुम्ही महिन्याभरात एक कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास त्यावर एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका २८ वर्षाच्या व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन अनिल गादेकर Chetan Anil Gadekar (वय २७, रा. टिळेकरनगर, कोंढवा Tilekar Nagar, Kondhwa) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जून २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. आरोपीने अनेक जणांना गंडा घातला असून आतापर्यंत चार जणांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अप्पर इंदिरानगर येथे व्यवसाय आहे.
आरोपी चेतन याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
भारत पे च्या मशीनवरुन महिन्याला १ कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन केल्यास त्यातून फायदा मिळेल. त्यामधून फिर्यादी यांना एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून या स्कीमसाठी ९ लाख ९ हजार ७६५ रुपये घेतले. अशाच प्रकारे त्याने या परिसरातील आणखी ३ जणांना स्कीमचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काही लाख रुपये लाटले. परंतु, त्यांना कोणताही फायदा न देता त्यांची फसवणूक केली आहे. चेतन याने आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता असून सहायक पोलीस निरीक्षक बरडे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Fraud of businessmen in the name of getting benefit on transaction of 1 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स