Pune Crime News | 35 लाख रुपयांची फसवणूक ! प्राईड अमन असोसिएट्सचे भागीदार नवाज शेख, हसन पठाण व आमीनुद्दीन शेख यांच्यावर FIR

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नाना पेठेत (nana peth) एका जागेत झोपडपट्टी नसतानाही झोपडपट्टी असल्याची माहिती एसआरए (slum rehabilitation authority) प्राधिकरणकडे कागदपत्रे देऊन एसआरए प्रकल्प (slum rehabilitation authority project) मंजूर करून घेत त्याठिकाणी 3 हजार चौरस फूट दुकान देण्याच्या बहाण्याने एकाची 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Monsoon Update । राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु, चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा

याप्रकरणी जाकीर मौला सय्यद (वय 40, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्राईड अमन असोसिएट्स pride aman associates partners नोंदणीकृत पार्टनर शिप ऑफिस अरोरा टॉवर आणि त्यांचे भागीदार नवाज रफिक शेख (वय 33), हसन अहमद पठाण व आमीनुद्दीन दाऊद शेख यांच्यावर भादवी कलम 406, 420, 405, 463, 464, 465, 466, 467, 468, 471 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2016 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Parambir Singh | परमबीर सिंग यांना २९ जुलैपर्यंत अटक नाहीच ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

Pune Crime News | Fraud of Rs 35 lakh! FIR against Nawaz Sheikh, Hasan Pathan and Aminuddin Sheikh, partners of Pride Aman Associates

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवार पेठ येथे राहण्यास आहेत. तर येतील प्राईड अमन असोसिएट्स pride aman associates ही संस्था असून, नवाज शेख व हसन पठाण हे पार्टनर आहेत. तर आमीनुद्दीन शेख हे आर्किटेक्ट आहेत. यातील सर्वांनी फिर्यादी यांना भेट घेत नाना पेठेतील सिटीएस नं. 1045 या ठिकाणीच्या साईड येथे 3 हजार चौरस फूट दुकान देण्याचे आमिष दाखविले त्यानंतर त्यांना यासाठी 35 लाख रुपये लागतील असे सांगत प्रथम पावणे दोन लाख व नंतर उर्वरीत रक्कम असे एकूण 35 लाख रुपये घेतले.

Bhosari MIDC Land Scam Case | एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांना देखील ईडीचं समन्स, गिरीश चौधरीनंतर सासु-सासरे ‘रडार’वर?

त्यानंतर फिर्यादी यांनी करार करून देण्यासाठी विनंती केली. पण, त्यांना करार करून दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी साईडला भेट दिली. त्यावेळी त्यांना ही साईड एसआरए अंतर्गत होत असल्याचे समजले. मग, त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे या कागदपत्रांची मागणी केली. तर ही कागदपत्रे मिळवली. त्यावेळी ही जागा आरोपी यांनी एका व्यक्तीकडून 3 कोटी रुपयांना भाडेकरूसह विकत घेतली असल्याचे समजले. त्यांनी या इमारतीचा सर्च रिपोर्ट घेतला. त्यात काही भाडेकरू या मिळकतीवर असल्याचे दिसून आले.

Monsoon Update | राज्यात मान्सूनचे दमदार आगमन; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट जारी

त्यांनी मिळकत झोपडपट्टी असल्याचे दर्शवून त्याची एसआरएकडे कागदपत्रे सादर करून पुनर्वसन
एसआरए अंतर्गत मंजूर करण्यासाठी व त्याद्वारे मोठा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर
केला. तसेच शेड्युल दोनची यादी तयारकरून झोपडपट्टी घोषित केली. एसआरए प्राधिकरणकडे
खोटी माहिती व दस्त देऊन झोपडपट्टी नसतानाही ती आहे, असे दर्शविले आणि त्याद्वारे एसआरए
प्रकल्प मंजूर करून घेतला व तो फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवला. त्यांच्याकडून 35 लाख रुपये
गुंतवणूक करण्यास लावत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास
समर्थ पोलीस (samarth police) करत आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime News | Fraud of Rs 35 lakh! FIR against Nawaz Sheikh, Hasan Pathan and Aminuddin Sheikh, partners of Pride Aman Associates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update