Pune Crime News | उच्चशिक्षीत तरूणाला इंग्लंडमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  उच्चशिक्षित तरुणाला इंग्लंडमध्ये नोकरी मिळवून देण्याचे अमिश दाखवत साडे चार लाख रुपयांना गंडा (Pune Crime News) घातला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात 30 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News | Fraud of Rs 4.5 lakh for luring a highly educated youth to get a job in England

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा माणिकबाग परिसरात राहतो.
तो चांगल्या नोकरीच्या शोधत (Job) होता. त्यासाठी त्याने ऑनलाइन पद्धतीने
काही ठिकाणी पाहणी केली होती.
यादरम्यान त्याला फेब्रुवारी महिन्यात “FR Sladesdown farm” या कंपनीच्या नावाने मेल आला.
या कंपनीत इंग्लंडमध्ये स्टोअर मॅनेजर पदावर नोकरी जागा असून,
त्याठिकाणी लावून देतो असे सांगितले. त्यानंतर याकंपनीच्या वतीने एका व्यक्तीने संपर्क केला.
त्यानंतर त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
इंग्लंडमध्ये जाण्यासाठी विजा प्रोसिजर व इतर कारणासाठी वेळोवेळी फिर्यादीला
बँक खात्यात 4 लाख 67 हजार 200 रुपये भरण्यास भाग पाडले.
मात्र पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिसात (Cyber Police) तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Fraud of Rs 4.5 lakh for luring a highly educated youth to get a job in England

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यात तरूणीनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरूणाचा रेकॉर्ड केला नग्नावस्थेतील व्हिडीओ, उकळले पैसे