Pune Crime News | भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने फूल व्यापाऱ्याची 67 लाखांची फसवणूक, 3 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिशी योजनेमध्ये (Bhishi scheme) गुंतवणुकीच्या आमिषाने पुणे शहरातील (Pune City) मार्केटयार्डातील (pune market yard) एका फूल व्यापाऱ्याची (flower merchant) आर्थिक फसवणुक (Financial fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फूल व्यापाऱ्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (market yard police station) फिर्याद दिली आहे. यावरुन मार्केट यार्ड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी फूल व्यापाऱ्याची 67 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केली. Pune Crime News Fraud of Rs 67 lakh by florist for lucrative investment FIR against 3 persons

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी हिरेन ट्रेडिंग कंपनीचे (Hiren Trading Company) भरत जोशी (Bharat Joshi), हिरेन जोशी (Hiren Joshi), दीपक जोशी (Deepak Joshi) यांच्या विरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंरक्षण अधिनियम (Maharashtra Protection of Interest of Depositors Act) या कायद्याान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आनंद माने anand mane (वय 53, रा. तानाजीनगर, धनकवडी) यांनी यासंदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (market yard police station) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद माने हे मार्केटयार्डामध्ये फूल व्यापारी आहेत.
हिरेन जोशी यांचा मार्केटयार्डात हिरेन ट्रेडिंग कंपनी (Hiren Trading Company) बारदान विक्रीचा व्यवसाय आहे.
माने यांची जोशी यांच्याबरोबर पाच वर्षापूर्वी ओळख झाली होती.
भरत त्यांची मुले हिरेन आणि दीपक यांनी त्यांच्या भिशी योजनेत (Bhishi scheme) माने यांना गुंतवणूक करण्यास सांगितले होते.
त्या वेळी गुंतवणूक (Investment) केल्यास आकर्षक परतावा (Attractive returns) देण्यात येईल, असे आमिष त्यांना दाखवले होते.

सुरवातीला जोशी यांनी त्यांना परतावा दिला. वर्षभरापूर्वी माने यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांनी माने यांच्याबरोबर संपर्कही टाळला.
त्यांनी भिशी योजना (Bhishi scheme) बंद केली असून अन्य मार्केटयार्डातील अन्य व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले असल्याचे माने यांना समजले.
जोशी यांनी 67 लाख 32 हजार 390 रुपयांची फसवणूक केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक के. बी. भालेराव (Assistant Inspector of Police K. B. Bhalerao) तपास करत आहेत.

Web Titel : Pune Crime News Fraud of Rs 67 lakh by florist for lucrative investment FIR against 3 persons