Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ओळखीचा फायदा घेत दोघांनी एका ज्येष्ठ महिलेची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. तसेच पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाला हात पाय मोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2020 ते आज पर्यंत येरवडा येथील लक्ष्मीनगर मध्ये घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत सीता जयसिंग खेडेकर Sita Jaisingh Khedekar (वय-65 रा. लक्ष्मीनगर येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुरुवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर गायकवाड (वय-35 रा. लक्ष्मीनगर, येरवडा), मिना बाळासाहेब शिनगारे (वय-72 रा. दापोडी) यांच्यावर आयपीसी 406, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून मदत म्हणून चार लाख रुपये घेतले.
पैसे घेताना करारनामा (Agreement) करुन जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवले.
महिलेकडून घेतलेल्या चार लाख रुपयापैकी केवळ चाळीस हजार रुपये आरोपींनी परत केले. उरलेल्या रक्कमेबाबत फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलाने विचारणा केली. तसेच त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी तुमचे पैसे मिळणार नाहीत, जर पैसे मागितले तर हात पाय मोडेन अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Disha Patani Gorgeous Look | इवेंटमध्ये दिशा पटानीने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…!