Pune Crime News | घरी खेळायला आलेल्या ९ वर्षाच्या मुलीबरोबर मैत्रिणीच्या वडिलांचे अश्लिल चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका सोसायटीत राहणार्‍या मैत्रिणीच्या घरी खेळायला गेलेल्या ९ वर्षाच्या मुलीबरोबर मैत्रिणीच्या वडिलांनी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

ही घटना वारजे माळवाडी (Warje Malwadi, Pune) येथील एका सोसायटीत २ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संग्रामसिंग पाटील याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ९ वर्षाच्या मुलीला तिच्या मैत्रिणीने खेळायला बोलविल्याने ती मैत्रिणीच्या घरी गेली.
तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जिन्याजवळ नेऊन तिच्याशी अश्लिल चाळे केले. इतरांना सांगू नको, असे म्हणून धमकावले.
त्यानंतर त्याने आपल्या मुलीला कपडे बदलण्यास आत पाठविले.
नंतर त्याने आपला प्रायव्हेट पार्ट या मुलीला दाखविल्याने ती घाबरुन सोसायटीच्या गार्डनमध्ये पळून आली.
हा प्रकार समजल्यानंतर आता तिच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Friend’s father sexually assaults 9-year-old girl who came to play at home

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, ठाकरे गटाची ‘ती’ मागणी फेटळली; पुढील सुनावणी मेरीटवर सुरु होणार

Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स्, बाश्री ब्लास्टर्स संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाने पटकावले विजेतेपद