Pune Crime News | डेटींग अ‍ॅपवर मैत्री, हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेलेल्या युवकाला…; पुण्यातील नऱ्हे परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर (Online Dating App) ओळख झाल्यानंतर त्याने मोबाईलनंबर तिच्यासोबत शेअर केला. त्यानंतर तिने तिचे फोटो पाठवले. नंतर तिने त्याला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. तिच्या सांगण्यावरुन त्याने रुम बुक केली. त्याठीकाणी दोघे भेटले, पण त्याठिकाणी आलेल्या तिच्या मित्राने आणि तिने तरुणाला मारहाण (Beating) करुन लुटले. हा प्रकार पुण्यातील नऱ्हे परिसरातील हॉटेल पुणे गेट (Hotel Pune Gate Narhe) येथे घडला आहे.(Pune Crime News)

याबाबत नऱ्हे येथे राहणाऱ्या 37 वर्षाच्या युवकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिला व एका पुरुषावर आयपीसी 394, 506, 34, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची सीकींग अॅडव्हेंचर (Seeking Adventure) या डेटिंग अ‍ॅपद्वारे
एका अनोळखी मुलीशी ओळख झाली. त्यानंतर तरुणीने तिचे फोटो टेलीग्रामवर पाठवून तुला भेटायचे आहे असे सांगितले. तिने भेटण्यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. त्यानुसार युवकाने नऱ्हे येथील पुणे गेट हॉटेलमध्ये रुम बुक केली. नंतर ती तरुणी युवकाला भेटण्यासाठी हॉटेलच्या रुममध्ये आली. दोघांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तरुणीने 12 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याने तिच्या मोबाईलवर पैसे पाठवले.

काही वेळाने तरुणीने पुन्हा 38 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. मात्र, त्याने पैसे पाठवण्यास नकार दिला.
त्यावेळी अनोळखी महिलेचा मित्र खोलीत आला. त्याने फिर्य़ादी यांना मारहाण करुन जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करुन घेतले.
तसेच फिर्य़ादी यांच्या हातातील सोन्याची अंगठी घेऊन दोघेजण निघून गेले. आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडून 90 हजार
रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation- Latur Farmer Suicide | मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना, संयम सुटला, आणखी एकाने जीवन संपवलं