Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मानेवर तलवार ठेवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत परिसरातील घरांवर, गाड्यांवर दगड मारुन दहशत पसरवली. तसेच एका मुलावर कोयता (Pune Koyta Gang) उगारुन मारहाण केल्याचा प्रकार फुरसुंगी येथे घडला आहे. हा प्रकार (Pune Crime News) शुक्रवारी (दि.17) रात्री पावणे अकराच्या सुमारास फुरसुंगी येथील ढेरे कंपनीजवळ घडला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर गुंडीबा कांबळे (वय-43 रा. संकेत विहार, फुरसूंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.18) फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी रिषभ हिवाळे (रा. ड्रीम्स आकृती समोर, काळेपडळ), रोहन कुदळे (रा. शिवतेज नगर, काळेपडळ), अस्लम शेख (रा. वैष्णवी सिटी, आदर्शनागर), विक्र जगदने, अक्षय कोळी (रा. काळेपडळ), पवन भारती (रा. तरवडे वस्ती) व इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 143, 144, 145, 149, 324, 506/2, 427, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फुरसुंगी येथील ढेरे कंपनीजवळ (Dhere Company Phursungi) बेकायदेशीर जमाव जमवला.
आरोपी रिषभ हिवाळे याने त्याच्या हातातील तलवार (Sword) फिर्यादी यांच्या मानेवर ठेवून तुम्हला सोडणार नाही तसेच घरच्यांनाही सोडणार नाही अशी धमकी दिली.
तर टोळक्यामधील एकाने फिर्यादी यांच्या मुलावर लोखंडी कोयता उगारला.
तसचे एका मुलाला बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
टोळ्याने परिसरातील घरांवर, टेम्पोवर दगड मारुन दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके (PSI Shelke) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Fursungit Koyta gang ranting, pelting stones on cars, houses and brutally beating the youth; FIR against 7 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taraka Ratna Passes Away | तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन

Bhandara Crime News | धक्कादायक! कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने महाप्रसादाच्या मंडपात शिरली कार

Nagpur Crime News | BSF जवानाच्या पत्नीला अमानुष मारहाण; गर्भपात करण्यास नकार दिल्याने उचलले ‘हे’ पाऊल