Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणात टोळक्यांचा धुडगुस; पूर्ववैमनस्यातून वाहनांची केली तोडफोड

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी शिवाजीनगर गावठाणात (Shivaji Nagar Gaothan) धुडगुस घातला असून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles In Pune) करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News)

याप्रकरणी शिवाजीनगर गावठाणात राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य वडसकर (रा. शिवाजीनगर गावठाण), विशालसिंह व इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेबरोबर आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी व त्यांचे दाजी हे गुरुवार असल्याने शंकर महाराज मठ येथे दर्शनाला जाऊन घरी परत आले होते. फिर्यादी या बिल्डिंगमध्ये जात असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या घराच्या बाजुला असणार्‍या रोडवरुन काही वाहने मोठमोठ्याने हॉर्न वाजवत आले. (Pune Crime News)

४ दुचाकीवरुन ८ ते १० जण आले होते.
त्यांनी वाहने लावून फिर्यादी यांच्या घराच्या दिशेने कडेला पडलेले दगड विटा उचलून फेकले.
त्यामुळे तेथील हॉस्टेलवर राहणारी मुले, मुली घाबरुन पळून गेली.
त्यानंतर या टोळक्याने घराचे गल्लीमध्ये पार्क केलेली होंडा सिटी कार, मोटारसायकल, रिक्षा यांच्यावर
दगडफेक करुन त्यांच्या काचा व हुड फाडून नुकसान केले.
त्याअगोदर या टोळक्याने जंगली महाराज मंदिराशेजारी असणार्‍या जे एम कॉर्नरमधील स्टॉलवर दगडफेक
(Stone Pelting In Shivaji Nagar Pune) करुन दहशत निर्माण केली होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहे.

Advt.

Web Title :- Pune Crime News | Gang riots in Shivajinagar village; Vandalism of vehicles due to prior animosity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | ट्रोलर्सला अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना