Pune Crime News | बारामतीमध्ये कारमधून गांजाची तस्करी, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; महिलेसह दोघांना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा (Marijuana) विक्री साठी नेला जात असलेला बारामती तालुका पोलिसांनी (Pune Rural Police) पकडला. ही कारवाई (Pune Crime News) शनिवारी (दि.28) बारामती शहरानजीक रुई पाटी येथे करण्यात आली. पोलिसांनी 10 लाखांचा गांजा आणि 5 लाखांची कार असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक (Arrest) केली.

 

सचिन दिलीप रणवरे Sachin Dilip Ranvere (वय 35 रा. हिवरकर मळा सासवड ता. पुरंदर जि. पुणे), सुनिता प्रताप चव्हाण Sunita Pratap Chavan (वय 35 रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मुळ रा. माहूरगड ता. पुसद जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

 

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे (Baramati Taluka Police Station) पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रुई पाटी जवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी केली. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (MH 12 JS 0090) रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांनी थांबली. पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता, गाडीच्या डीकीमध्ये 10 लाख रुपये किमतीचा 50 किलो गांजा मिळून आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (Addl SP Anand Bhoite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे (API Yogesh Langute),
पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, साळवे, पोलीस अंमलदार राम कानगुडे, सुरेश दडस, अतुल पाटसकर,
राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे. अमोल नरुटे, बापू बनकर, संतोष मखरे,
दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांच्या पथकाने केली. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे करीत आहेत.

 

Advt.

Web Title :- Pune Crime News | Ganja smuggling from car in Baramati, worth 15 lakh seized; Two arrested, including a woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण