Pune Crime News | साध्या कणकणीवर डॉक्टरांकडून उपचार करुन घेणे बेतले जीवावर; दोघा डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

पुणे पोलीसनामा ऑनलाईन : Pune Crime News | अंगात कणकण असल्याने तो तरुण डॉक्टरांकडे गेला. पण, त्याच्यापुढे काय वाढून ठेवले होते, हे त्याला समजले नाही. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले. त्याने इन्फेक्शन होऊन त्याला आपले प्राण गमावावे लागले. (Pune Crime News)

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याने पोलिसांनी दोन डॉक्टरांसह परिचारिकेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

डॉ. खालीद सय्यद (वय ५०, रा. बोपोडी), डॉ. आयेशा सय्यद (वय ४६) आणि परिचारिका सुनिता गडपल्लु (वय ४८,रा. खडकी बाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अतुल तुपसौंदर्य (वय २६, रा. खडकी बाजार) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार खडकीतील डॉ. सय्यद हॉस्पिटलमध्ये २० सप्टेंबर २०२१ मध्ये सायंकाळी घडला होता. त्यानंतर आता तब्बल सव्वा वर्षानंतर तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)

याबाबत कविता अतुल तुपसौंदर्य (वय २५, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी बाजार) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद (गु़रजि. नं. ४६/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल तुपसौंदर्य यांना २० सप्टेबर २०२१ रोजी अंगात कणकण वाटत होती. त्यामुळे ते सायंकाळी खडकीतील जुना बाजार येथील डॉ.
सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले.
तेथे डॉ. खालीद व डॉ. आयेशा यांनी त्यांच्या कमरेवर उजव्या बाजूला इंजेक्शन दिले.
या चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्या जागी इन्फेक्शन होऊन गाठ झाली.

त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना २४ सप्टेबर २०२१ रोजी त्यांचा मृत्यु झाला. याबाबत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अतुल यांचा मृत्यु झाल्याची तक्रार करण्यात आल्याने ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती नेमण्यात आली होती.
तिचा अहवाल तब्बल सव्वा वर्षानंतर प्राप्त झाला.
त्यांच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खडकी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Getting treated by a doctor for a simple concussion is
life-threatening; A case has been registered against two doctors and nurses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narayan Rane | नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले-‘तुम्ही पत्रकार नसून शिवसेनेचे प्रवक्ते’

Pune Traffic Update News | पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलीस अधिकारी, 2 किमीच्या अंतरासाठी लागला दीड तास