Pune Crime News | पुणे: टी शर्ट ट्रायल करत असताना तरुणीचा विनयभंग, कॅम्पमधील दुकानातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणी टी शर्ट खरेदी करुन त्याची ट्रायल घेत असताना दुकानातील तरुणाने तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनास लज्जा (Molestation Case) उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मुकुंदनगर (Mukund Nagar) येथील एका २० वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैफ कलीममुल्ला शेख Kaif Kalimullah Shaikh (वय २४, रा. जुना बाजार, खडकी – Juna Bazaar Khadki) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महात्मा गांधी रोडवरील (MG Road Pune) नाज चौकाजवळील अशोक विजय कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी दुपारी १ वाजता घडला.

Pune Crime News

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आरोपीच्या दुकानात टी शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने एक टी शर्ट खरेदी केला. अंगात असलेल्या क्रॉप टी शर्टवर ती नवीन टी शर्ट ट्रायल करत होती. त्यावेळी दुकानातील कैफ शेख याने क्रॉप टी शर्ट वर येईल या बहाण्याने या तरुणीचा जवळ गेला. टी शर्ट धरण्याचा बहाणा करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे (PSI Mokate) तपास करीत आहेत.

Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळगड येथे बचाव मोहिमेचा दुसरा दिवस; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

Asthma In Monsoon | पावसाळ्यात वाढत आहे अस्थमाचा धोका, अशी घ्या काळजी

Pune Crime News | ‘नासा’ला द्रव्य विकण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मागितल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरात शिरुन मारहाण

Maharashtra Rain Update | कोकणासह विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन; हवामान खात्याचा अंदाज

Manipur Women Violence | मणिपूर मधील महिलांवर झालेल्या निंदनीय घटनेवर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केला रोष

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या

Pune Crime News | दालचाचे पैसे मागितल्याने डोक्यात सळई घालून केले जखमी; गुंडाला पोलिसांनी केले जेरबंद

Madhuri Dixit | खलनायक चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी माधुरी दीक्षितकडून लग्नाआधीच ‘नो प्रेग्नेंसी क्लॉज’ घेतला लिहून

Varandha Ghat Road | पुणे: पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद