पुणे : Pune Crime News | सायंकाळी फिरायला कट्ट्यावर बसलेल्या एका ७३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेला दोघा भामट्यांनी रेशनचे धान्य मिळवून देतो,असे सांगून एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घेऊन गेले. तेथे अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितल्यावर या महिलेने हे दागिने पर्समध्ये ठेवले. ही पर्स एका पिशवीत ठेवायला सांगून दोघे जण धान्य घेऊन येतो, असे सांगून गेले. या ज्येष्ठ नागरिक महिलेने तिच्याकडील पिशवीत पाहिले तर, त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कमऐवजी ४ वेफर्सची व ४ बिस्किटाचे पुढे आढळून आले.
गणेश पेठेत राहणार्या एका ७३ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गणेश पेठेतील सुविधा गणेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या घरासमोरील दुकानाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. तेव्हा दोघे जण आले. त्यांनी समोर धान्य वाटप चालू आहे. आम्ही तुम्हाला धान्य मिळवून देतो, असे सांगून समोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी तुमचे गळ्यातील पोत व कानातील कर्णफुले काढून ठेवा असे सांगितले. त्यांनी त्यांच्याकडील कापडी पाकिटात काढून ठेवले. त्यानंतर त्यातील एकाने त्याच्याजवळील पोपटी रंगाची कापडी पिशवी त्यांना दिली व सोने काढून ठेवलेले कापडी पाकीट त्याने त्याचेजवळ घेतले. आम्ही धान्य घेऊन परत येतो, तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा असे म्हणून गेले. बराच वेळ ते आले नाही तेव्हा, त्यांनी दिलेली कापडी पिशवी तपासून पाहिल्यावर त्यामध्ये ४ वेफर्सची व ४ बिस्किटाचे पुढे आढळून आले. चोरट्यांनी सोन्याची पोत, कर्णफुले असा १० ग्रॅमचे दागिने व २ हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक जहाळे तपास करीत आहेत.