Pune Crime News | वडारवाडीमधील किराणा दुकानातून सव्वा चार लाखांचा गुटखा जप्त; खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : Pune Crime News | वडारवाडी येथे किरणा दुकानात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला ४ लाख २२ हजार रुपयांचा विमल गुटखा (Vimal Gutkha) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell, Pune) पकडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी सुरेश किसन कलाधर (वय ५९, रा. महालेनगर, वडारवाडी) याला अटक (Arrest) केली आहे.

याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक दुर्योधन गुरव यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात गस्त घालत असताना त्यांना वडार हौसिंग सोसायटीत पान मसाला व तंबाखु विक्रीसाठी आणला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare) यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी वडार हौसिंग सोसायटीत छापा घातला.
त्यात एका खोलीमध्ये पॉलिथीन व बारदानामध्ये विमल पान मसाला व तंबाखुची पोती आढळून आली.
पोलिसांनी ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Gutkha worth four and a half lakhs seized from grocery shop in Wadarwadi; Action of Anti-Extortion Squad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना