Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – वसतीगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या तथाकथित समाजसेवकाला अटक

पुणे : Pune Crime News | शिक्षणाकरीता वसतीगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार (Rape In Pune) करणार्‍या एका तथाकथित समाजसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

लॉरेन्स फ्रॅन्सिस अँथेनी Lawrence Francis Anthony (वय ५०, रा. शांताई टॉवर, चारवाडा, मांजरी – Manjari) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८००/२३) दिली आहे. हा प्रकार मांजरीतील आरोपीच्या घरी एप्रिल २०१९ ते सप्टेबर २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका शाळेत शिक्षणाकरीता असताना तेथे वसतीगृहामध्ये
काम करणारा लॉरेन्स अँथेनी याने फिर्यादी यांना ते पिंपरी चिंचवड येथे नवीन वसतीगृह चालू करणार आहे.
त्या ठिकाणी इथल्या वसतीगृहापेक्षा चांगली सुविधा आम्ही देणार आहे.
असे बोलून फिर्यादी यांना त्यांच्या घरी घेऊन गेला. त्यांच्याकडून त्यांच्या घरातील कामे करायला लावली. आरोपीची पत्नी व मुले घरी नसताना फिर्यादी या एकट्या घरी असताना त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. हे करताना त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार (Rape Case) केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Hadapsar Police Station – social worker arrested for raping minor girl in hostel

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोल्हापूर जिल्हयातील दरोडेखोरांच्या टोळीला अटक ! 25 लाखाचा माल जप्त, सातारा येथून सोनं-चांदी लुटलं होतं; जाणून घ्या स्टोरी

Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

Maji Sainik Sanghatana | माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात