Pune Crime News | नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर मेसेज करुन दिला त्रास; तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | विवाह जुळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांमध्ये बोलणी झाली. परंतु, तरुणीकडून नकार दिला असतानाही तो तुझ्याशीच लग्न करायचे असून म्हणून आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. तरुणीला सोशल मीडियावर (Social Media) अश्लील मेसेज (Obscene Messages) पाठवून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील एका २४ वर्षाच्या तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६९/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय रोहिदास गुंजाळ Akshay Rohidas Gunjal (वय २८, रा. खंडोबा माळ, चाकण -Chakan) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार लक्ष्मीनगरमधील महाविद्यालयात जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
अक्षय गुंजाळ याला ही तरुणी आवडल्याने त्याचे वडिल फिर्यादीच्या मामाच्या घरी गेले.
त्यांनी आम्हाला तुमचे स्थळ आवडले आहे तरी बोलणी चालू ठेवा,असे सांगितले.
त्यावर फिर्यादीचे मामाने त्यांना सांगितले की, त्याचा नकार आहे.
तरीही अक्षय हा फिर्यादीचा वारंवार पाठलाग करुन तिला त्रास देऊ लागला.
फिर्यादीला मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी देत होता.
त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) फिर्यादीस मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केले.
या त्रासाला कंटाळून शेवटी या तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करीत आहेत.

Web Title :Pune Crime News | Harassed by messages on social media after refusal; A case of molestation has been registered against the youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | स्पिकरच्या त्रासाविरोधात नागरिकानेच उठविला आवाज; साऊंड सिस्टमची केली तोडफोड, कोंढवा पोलीस ठाण्यात FIR

Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई