Pune Crime News | आताच मर्डरमधून बाहेर आलोय, दोघा गुंडांचा हॉटेलमध्ये धुडगूस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दोन वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये केलेल्या खूनात (Murder) पोलिसांना (Pune Police) मदत केली असे समजून दोघा गुंडांनी हॉटेलमध्ये शिरून धुडगूस घातला. हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत भानुदास तुकाराम भोसले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टक्या ऊर्फ तिरुपती लष्करे (रा. पापडे वस्ती) आणि शुभम करांडे (रा. पापडे वस्ती) यांच्यावर आयपीसी 427, 352, 323, 504, 506, 34 सह आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार भेकराईनगर येथील कानिफनाथ अमृततुल्य हॉटेलमध्ये (Amrittulya Hotel) 1 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल आहे. आरोपींनी 2021 मध्ये हॉटेलमध्ये खून केला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना मदत केली असल्याचा आरोपींचा समज झाला. ते दोघे हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकून देऊन काऊंटरची काच फोडली. हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवून फिर्यादीच्या अंगावर धावून आले. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच टक्या याने त्याच्या हातातील शस्त्र हवेत फिरवून मी आताच मर्डरमधून बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेल, त्याचा मी गेम करेन, अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक सुशील डमरे (PSI Sushil Damre) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार