Pune Crime News | विवाहित प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला महिलेच्या पतीने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.1) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिवप्रताप चौकात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत नानापेठ येथे राहणाऱ्या 83 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन गणेश पेठेत राहणाऱ्या महिलेच्या पतीवर आयपीसी 326, 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पुतण्याचे गणेश पेठेत राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध (Love Affair) आहेत. महिलेने फिर्यादी यांच्या पुतण्याला भेटण्यास नकार दिल्याने तो महिलेच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. (Pune Crime News)

त्यावेळी महिलेचा पती त्याठिकाणी आला. पत्नीला भेटण्यासाठी आल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. महिलेच्या आरोपी पतीने फिर्यादी यांच्या पुतण्याला शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण केली. तसेच त्याठिकाणी पडलेला दगड फिर्यादी यांच्या पुतण्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गोरड (PSI Akshay Kumar Gord) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून आत्येभावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड