Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग

पुणे : Pune Crime News | एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग (Molestation) करुन शरीरसुखांची मागणी केली. तिने लग्नाविषयी विचारल्यावर त्याने आयुष्यातून निघून जाण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी सुस येथील एका ३० वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हडपसर (Hadapsar News) मधील भोसलेनगरमध्ये राहणार्‍या तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवर ८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी तरुणाची शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाली. लग्नाबाबत एकमेकांना जाणून घेण्यासाठी ते भेटले होते.
फिर्यादी या आरोपीच्या गाडीत बसल्या असताना त्याने अश्लिल चाळे करुन विनयभंग केला.
मला तू आवडतेस असे म्हणून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
फिर्यादी या घरी गेल्यानंतर आरोपीला फोन करुन आपण लग्न करु, असे बोलल्या.
तेव्हा आरोपीने लग्नासाठी टाळाटाळ करुन माझ्या आयुष्यातून निघून जा, नाही तर तुला खूप महाग पडेल,
अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर या तरुणीने फिंर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गाडेकर
(Sub-Inspector of Police Gadekar) तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | he demanded physical pleasure and committed molestation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Accident News | महाबळेश्वरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

Pune Crime News | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; मुंढवा येथील खळबळजनक घटना