Pune Crime News | संसारात अडथळा नको, म्हणून प्रेयसीचा गळा दाबून केला खून; गळफास घेतल्याचा केला बनाव

पुणे : Pune Crime News | महिलेने गळफास घेतल्याचा बनाव करुन तातडीने महिलेला ससून रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदनातून गळा दाबून खून (Murder) केल्याचा प्रकार उघड झाला. त्यावरुन पोलिसांनी पतीपत्नीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

रईस हनिफ शेख (वय ४०) आणि शबाना रईस शेख (वय ३५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्या पतीपत्नीची नावे आहेत. फातीमाबी शेख (वय ३४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२३) दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील गल्ली नं. २३ मध्ये शुक्रवारी सकाळी ६.४५ ते ८.३० दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईस शेख हा मजुरी काम करतो. त्याचे सुमारे १२ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. सुमारे ३ वर्षांपूर्वी त्याचे फातीमाबी शेख हिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले.
त्याने आपल्या घरापासून काही अंतरावर तिला घर घेऊन दिले होते.
फातिमाबीचा त्यांच्या संसारावर हस्तक्षेप वाढत होता. त्यातून त्यांच्यात वादावादी सुरु झाली.
शुक्रवारी सकाळी अशीच त्यांच्यात वादावादी झाली असताना रईस याने तिला मारहाण करुन तिचा गळा दाबला.
त्यात तिचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी तिला घेऊन तसेच ससून रुग्णालयात नेले.
तेथे त्यांनी शेख हिने गळफास घेतल्याचे खोटेच डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, साक्षीदारांकडे केलेली चौकशी यावरुन त्यांना संशय आला.
शेख हिला केलेला इन्क्वेस्ट पंचनामा, डॉक्टरांनी दिलेले अ‍ॅडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेले कारण याची
चौकशी केल्यावर दोघांनी गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी होऊन दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | He killed his beloved by strangling her because she didn’t want to be a hindrance in the world; A mockery of hanging