
Pune Crime News | धक्का लागल्याच्या रागातून दगड मारुन केले गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | विसर्जन मिरवणुक (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) पाहून घरी जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघांनी एका तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) करुन दगड मारुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)
याबाबत रोहित राजु बिचुकले (वय २७, रा. खोपडेनगर, गुजरवाडी रोड, कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९९५/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाळा कवडे (वय ४०) आणि भाऊसाहेब हुलगे (वय २४, रा. गोकुळनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गोकुळनगर येथे गुरुवारी रात्री एक वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी हे गणपती विसर्जन संपल्यानंतर घरी जात असताना त्यांचा आरोपींना धक्का लागला. तेव्हा त्यांनी फिर्यादीस जोरजोरात शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी त्यांची ओळख सांगून त्यांची माफी मागितल्यानंतरही त्यांचे काहीही न ऐकता बाळा कवडे याने खाली पडलेला दगड उचलून फिर्यादींच्या डोक्यात मारला. भाऊसाहेब हुलगे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन ते पळून गेले. फिर्यादी यांनी उपचार केल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पुण्यातील ससून हॉस्पीटलच्या गेटवर अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त; कोटयावधीचं एमडी जप्त, प्रचंड खळबळ
माझ्याकडे बघुन थुंकला का म्हणत तरुणाच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
01 October Rashifal : महिन्याचा पहिला दिवस या ५ राशींसाठी शुभ, धनलाभाची संधी, वाचा दैनिक भविष्य