पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे स्टेशन (Pune Railway Station) व परिसरातील मोटारसायकलची चोरी करुन तो दौंड परिसरात आपली असल्याचे सांगून विक्री करत होता. समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) पकडल्यावर त्याने या चोर्या आपल्यावरील कर्जाच्या फेडीसाठी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तब्बल १० दुचाकी जप्त केल्या आहेत. (Vehicle Theft Detection)
अरविंद मोतीराम चव्हाण Arvind Motiram Chavan (वय ३९, रा. दौंड) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जुलै रोजी स्प्लेंडर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाने गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून तब्बल ७० ते ८० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
पोलीस शिपाई कल्याण बोराडे व शरद घोरपडे त्या अनुषंगाने मिळालेली माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत असताना सोमवार पेठेतील सारस्वत कॉलनी येथून पोलिसांकडे पाहून संशयितरित्या मोटारसायकलवरुन पळून जाऊ लागला. पोलिसांना पाठलाग करुन त्याला पकडले. अरविंद चव्हाण याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सोमवार पेठेतील एस व्ही युनियन शाळेसमोरुन ही मोटारसायकल चोरली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याच्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन दौंड परिसरातील लोकांना ही वाहने स्वत:चीच असल्याचे खोटे सांगून विकली असल्याची कबुली दिली. आरोपीकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. बंडगार्डन व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार पगार, हवालदार इम्रान शेख, हवालदार रोहिदास वाघेरे, रवींद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, पोलीस अंमलदार रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, अविनाश रवडे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा