Pune Crime News | अति वेग जिवावर बेतला! पीएमपीएमएल बसला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; रावेत बीआरटी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भरधाव वेगात दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाताना दुचाकीस्वार पीएमपीएमएल बसवर (PMPML Bus) जाऊन आदळला. यामध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रावेत येथील भोंडवे वस्ती येथील बीआरटी रोडवर (BRT Road) बुधवारी (दि.29) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)

अक्षय जयकुमार ओहोळ Akshay Jayakumar Ohol (वय-26 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव असून त्याच्यावर रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) आयपीसी 279, 304अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल चालक अलिम बाबुमिया ओहोळ (वय-26 रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील पीएमपीएमएल बस (एमएच 14 एच.यु 5377) बी.आर.टी. मधून घेऊन जात होते. भोंडवे वस्ती बस स्टॉपच्या जवळ असलेल्या अर्बन स्पाईन हॉटेल समोरील बी.आर.टी रोड मधून समोरुन मकाई चौकाकडून रावेत चौकाकडे अक्षय ओहोळ दुचाकीवरुन (एमएच 14 बीडी 128) भरधाव वेगात जात होता. त्याने समोरील दुचाकीला ओव्हरटेक करून वेगात येवून फिर्यादी यांच्या पीएमपीएमएल बसला धडकला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे (PSI Panhale) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात