Pune Crime News | पत्नी शारिरिक सुख देत नसल्याने एचआयव्ही बाधित पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | An attempt was made to set a woman on fire by throwing kerosene on her body in Mandhwa
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीला एचआयव्ही (एड्स HIV/AIDS) असल्याने पत्नी त्याच्यासोबत नांदत नसल्याने आणि शारिरीक संबंध ठेवत नसल्याने पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार (Stabbing) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) सोमवारी (दि.23) सायंकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडला आहे.

 

बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police Station) आरोपी पतीवर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक असून त्याला एच.आय.व्ही (एड्स) ची लागण झाली आहे. त्यामुळे फिर्यादी महिला ही त्याच्यापासून विभक्त राहत आहे. पत्नी विभक्त राहत असल्याने आणि शारिरीक सुख देत नसल्याने आरोपीने सोमवारी सायंकाळी चाकूने सपासप वार केले.

आरोपीने महिलेच्या छातीवर, डाव्या दंडावर व गुप्तांगावर वार करुन गंभीर जखमी केले. जखमी महिलेला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी तात्काळ पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | HIV infected husband stabs his wife with a knife as
his wife is not giving him physical pleasure, a shocking incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’