Pune Crime News | प्रचाराच्या रणधुमाळीत कसब्यात ६ ठिकाणी घरफोड्या; तपकीर गल्लीत ७ लाखांचा ऐवज लंपास, ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | कसबा पेठ पोटनिवडणुकीतील (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना गजबजलेल्या तपकीर गल्ली परिसरात चोरट्यांनी ६ ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी २ ठिकाणी सदनिका फोडून सात लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. (Pune Crime News)

याबाबत सतीश कामतकर (वय ५२, रा. शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंट, तपकीर गल्ली, ५५५ बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपकीर गल्ली गजबलेला भाग असून या भागातील शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंटमध्ये कामतकर यांची सदनिका आहे. चोरट्यांनी कामतकर यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाट उचकटले. कपाटातील पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ३ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याच परिसरातील आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. त्याचबरोबर आणखी ४ ठिकाणी सदनिकाचे कडी कोयंडा तोडले. परंतु, तेथे चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. (Pune Crime News)

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे़ कसबा पेठेत सर्वत्र बंदोबस्त असतो़ असे असताना
कसबा गणपतीपासून २०० ते ३०० मीटर परिसरातील एका भागातील ६ सदनिका एका रात्रीत फोडण्यात
आल्याने खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

Web Title :- Pune Crime News | House burglaries in 6 places in the town during the battle of campaigning; 7 lakhs stolen in Tapkir Galli, attempted theft at 4 places

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

ICC Ranking | अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये जडेजा अव्वल स्थानी विराजमान; टॉप 5 मध्ये ‘या’ 3 भारतीयांचा समावेश